Upwas Special - Rajgira Sheera

हॅलो फ्रेंड्स, 

उद्या आषाढी एकादशी... 
ते म्हणतात ना, "एकादशी दुप्पट खाशी" ते अगदी खरं आहे... 
लहान असताना आई आणि आज्जी दोन -तीन दिवस आधीच एकादशी चा चक्क "मेनू" ठरवायला सुरुवात करायच्या. साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याची खीर, वरीचा भात - शेंगदाण्याची आमटी, खजुराची खीर, उपवासाचा भाजणीचे थालीपीठ, बटाट्याची भाजी, राजगिऱ्याचे लाडू, खूप सारी फळं असा अस्सल ब्राह्मणी बेत असायचा - चंगळ असायची नुसती. मज्जा यायची एकादशी अली कि .....
 
आता लग्नानंतर समजत हे "मेनू" ठरवणं म्हणजे रोजची कसरत असते ..... 
ह्या दोन तीन वर्षात सासूमॉम नि गुजराती उपवासाच्या डिशेश ची ओळख करून दिली - कुटीची डाळ, आरारूट ची खांडवी, वरीची ताकातली खिचडी, राजगिरा ठेपला आणि दुधी भोपळ्याची आंबट गोड भाजी, कचोरी आणि नुकताच शोध लागलेला पदार्थ म्हणजे  "राजगिऱ्याच्या शिरा"  

Rajgira Sheera



राजगिऱ्याचे गुणधर्म  - 
Rajgira Flour 

राजरीर अमरनाथ ह्या झाडाच्या बियांपासून  बनवला जातो. राजगिरा, पीठ, ल्हया ह्या स्वरूपात वापरला जातो. 
साधारणतः, उपवासाच्या दिवशी वापरला जाणारा राजगिरा पचण्यास अत्यंत हलका आणि शरीरा साठी एकदम पौष्टिक असतो. 
  • राजगिऱ्यात शरीराला आवश्यक असणाऱ्या अनेक तत्वांचा समावेश असतो. कॅल्शिअम, आयर्न, मँगनेशियम, फॉस्फोरोस, पोटॅशियम ह्याचा हा उत्तम स्रोत आहे. 
  • इतर धान्याचा तुलनेत राजगिऱ्यात तीनपट कॅल्शिअम असतं आणि त्याने हाडं मजबूत होण्यात मदत होते. 
  • ह्या मध्ये मुबलक प्रमाणात लायसिन असतं ज्याने केसांच्या समस्या दूर होतात. 
  • कमी फॅट असल्याने आणि भरपूर फायबर आणि प्रोटीन असल्याने, राजगिरा कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मद्त करतो 

सासूमॉमची अगदी साधी सोप्पी राजगिऱ्याच्या शिऱ्या ची रेसिपी .... 
Serves - 2 

साहित्य - 
३ चमचे राजगिरा पीठ 
३ - ४ चमचे साजूक तूप
३ - ४ चमचे गूळ (किंव्हा साखरहि चालेल) 
१ कप दूध 
१ ग्लास कोमट पाणी 
२ चिमूट वेलची पूड 
(आवडत असतील तर ड्रायफ्रुटस )

कृती 
- २ चमचे तुपात राजगिऱ्याचे पीठ खमंग भाजून घ्या 
- भाजताना थोडं थोडं तूप घाला 
- गूळ / साखर घालून नीट परतून घ्या 
- शिजवण्या साठी कोमट पाणी घाला (गुठळ्या होणार नाहीत ह्याची काळजी घ्या)
- थोडं थोडं दूध घालून फिरवत राहा 
- झाकण लावून मंद आचेवर ३-४ मिनिटांसाठी शिजवा 
- वेलची पूड आणि आवडते ड्रायफ्रुटस घालून सर्व्ह करा

#VANNFoodLibrary वर नक्की कळवा तुमचा favourite उपवास स्पेसिअल पदार्थ ...

Comments